महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय ताकतोडेच्या जलसमाधीकडे सरकारचे दुर्लक्ष; लहुजी शक्ती सेनेचे आंदोलन - जालना आंदोलन

जालना शहरात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 'जल आंदोलन' करण्यात आले.

जल आंदोलन

By

Published : Mar 8, 2019, 7:08 PM IST

जालना - मातंग समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी केज तालुक्यातील संजय ताकतोडे या तरुणाने ३ दिवसांपूर्वी जलसमाधी घेतली होती. सरकार या घटनेकडे दुर्लक्ष करत असून याचा निषेध म्हणून आज शहरात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 'जल आंदोलन' करण्यात आले.

जल आंदोलन

मातंग समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संजय ताकतोडे याने ३ दिवसांपूर्वी जलसमाधी घेतली होती. त्याचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी शहरालगत असलेल्या मोतीबाग तलावामध्ये जल आंदोलन करण्यात आले. त्याबरोबरच त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करावी आणि परिवारातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी असंख्य लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून समज देऊन सोडून दिले. आंदोलनकर्त्यांनी या मागणीचे निवेदन जालन्याच्या तहसीलदारांना दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details