जालना - नगरपरिषद तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना असलेल्या वेतनश्रेणी प्रमाणेच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी लागू करावी, यासाठी कर्मचारी युनियन (शाखा-जालना) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनातील करवसुलीची अट रद्द करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. हापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या ग्रामपंचायतीत उपदान मंजूर होते, मात्र ज्या ठिकाणी कमी कर्मचारी आहेत, अशा ठिकाणी देखील हे लागू करण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष पंडित सोनवणे तसेच सचिव महेश उघडे यांनी केले.
अन्य मागण्या
ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कार्यालयात जमा करण्यात यावी.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा.