महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Live Video: कीर्तनकार ताजुद्दीन बाबा यांचे किर्तन सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ताजुद्दीन बाबा यांचे कीर्तन करताना हृदयविकाराचा झटका आला निधन झाले आहे. ही घटना काल रात्री नंदुरबार येथे घडली. ताजुद्दीन बाबा हे घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथील रहिवासी होते.

ताजुद्दीन बाबा यांचे निधन
ताजुद्दीन बाबा यांचे निधन

By

Published : Sep 28, 2021, 1:51 PM IST

Updated : Sep 28, 2021, 2:41 PM IST

जालना -हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले ताजुद्दीन बाबा यांचे कीर्तन करताना हृदयविकाराचा झटका आला निधन झाले आहे. ही घटना काल रात्री नंदुरबार येथे घडली. ताजुद्दीन बाबा हे घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथील रहिवासी होते. त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांचे मंदिर उभे केले होते.

व्हिडीओ

कीर्तन करताना झाला मृत्यू -

ताजुद्दीन बाबा यांचे नंदुरबारमध्ये कीर्तन सुरू होते. त्यांच्या कीर्तनाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते व्यासपीठावर बसले. कीर्तन सुरू असताना काही जण आपल्या मोबाइलमध्ये हे शूट करत होते. त्याचवेळी ताजुद्दीन बाबांना ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. हिंदू-मुस्लीम धर्मातील दरी मिटवण्यासाठी त्यांनी हजारो कीर्तने केली. त्यांचा जन्म औरंगाबादमधील सातारा भागात झाला होता. त्यांनी काही काळ पुणे येथे जाऊन कंपनीमध्ये काम ही केले होते. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागला.

हेही वाचा - प्रवाशांनी भरलेली ST बस पुराच्या पाण्यात कलंडली, एकाचा मृत्यू, 3 बेपत्ता, बघा थरारक VIDEO

Last Updated : Sep 28, 2021, 2:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details