महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोळीबार प्रकरण आणखी सात आरोपी अटकेत, एकूण संख्या 10 - jalna firing update news

पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीची पुंगळी जप्त केली होती. त्यानंतर सरकारतर्फे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सुमारे पंचवीस ते तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

kadimb police station
kadimb police station

By

Published : Jul 30, 2020, 1:01 PM IST

जालना- नूतन वसाहत गोळीबारप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी काल (बुधवार) दिनांक 29 ला चार आरोपींना अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता कालचे चार आणि यापूर्वी पकडलेली तीन अशा सातही आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. गोळीबार प्रकरणात एकूण पकडलेल्या आरोपींची संख्या आता दहा झाली आहे.

नूतन वसाहत भागात दिनांक 23 जुलैला सायंकाळी सात वाजता सतकर कॉम्प्लेक्स जवळ तीन वेळा गोळीबार झाला होता. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीची पुंगळी जप्त केली होती. त्यानंतर सरकारतर्फे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सुमारे पंचवीस ते तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर त्याच दिवशी राहुल शिनगारे, आशिष चव्हाण ,संभाजी शिरसाट, यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर दुसऱ्या दिवशी कदीम जालना पोलिसांनी वरिष्ठ न्यायालयात अपील करून आरोपींना पोलीस कोठडी मागितली आणि न्यायालयाने ती मान्य केली.

त्यानंतर काल दिनांक 29 ला कदिम जालना पोलिसांनी शुभम गोरडे, किशोर मगर ,विकास मस्के या तिघांना ताब्यात घेतले होते. यांना काल दिनांक 29 ला न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यानंतर आणखी चार जण रितेश चौधरी ,सागर मेहता, दीपक जाधव ,मनोज झीने यांना ताब्यात घेतले आहे. या चौघांनाही आज दुपारी न्यायालयात हजर केले जाऊन त्यांना आज पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details