जालना -जुना जालना भागातील दीड लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त 72 पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची जबाबदारी कोणावर? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हे कर्मचारी आता हवालदिल झाले आहेत. लघुशंकेला तर ठिकाणचं नाही. बसण्याची सर्वच ठिकाणे धोक्यात आली आहेत. त्यामुळे या सैनिकांनी लढायचे कोणाच्या भरोशावर? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रविवारी रात्री पोलीस ठाण्याच्या महत्त्वाच्या भागाचे छत कोसळले. या घटनेमुळे पोलीस प्रशासन नरबळीची प्रतीक्षा करीत आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा-दुष्काळासह मंदीच्या फेऱ्यातील वाहन उद्योगाला सणांमधून मिळाली 'संजीवनी'
जुना जालना भागात दीडशे वर्षांपूर्वीची एक इमारत आहे. या इमारती मध्येच सध्या कदीम जालना पोलीस ठाणे कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीची चार-पाच वर्षाला रंग देण्याशिवाय कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विटांनी, माती आणि प्लास्टर सोडून दिले आहे. कुठल्याही कोपऱ्यातून पाणी खाली उतरत आहे. यातूनच रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वायरलेस संच असलेल्या कक्षाचा छत कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. दोन महिन्यापूर्वीच हे छत कोसळण्याची शक्यता असल्यामुळे त्याची डागडुजी करण्यात आली होती. आज ते कोसळले. या कक्षाच्या बाजूलाच अतिमहत्वाचे असे पोलिसांची सीसीटीव्ही यंत्रणा सीएसटीएन यंत्रणा, महत्त्वाच्या कागदपत्रांची कपाटे आणि समोरच ठाणे आमदाराचा टेबल आहे. या महत्त्वाच्या बाबी असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जिथे हे छत कोसळले त्याच छताखाली रात्री-बेरात्री कर्तव्य बजावून आलेले आणि जाणारे पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी विश्रांती घेतात. कदाचित हे छत मध्यरात्री कोसळले असते तर जीवित होण्याचीही शक्यता होती. असे असतानाही पोलीस प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.