महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सात दिवसाच्या अथक परिश्रमानंतर जेसीबी काढले बाहेर - jalna news

मागील शनिवारी (दि. 1 जून) एक जेसीबी विहिरीत पडला होता. तो बाहेर काढण्यास शुक्रवारी (दि. 5 जून) यश आले आहे.

जेसीबी
जेसीबी

By

Published : Jun 7, 2020, 2:38 PM IST

जालना - घनसांवगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील शेतातील विहिरीत दि 1 जूनला जेसीबी विहिरीत पडले होते. तेव्हापासून जेसीबी मालकाच्या वतीने हे मशीनवर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. आठवडाभराच्या अथक प्रयत्नानंतर हे जेसीबी वर काढण्यास यश आले आहे.

जेसीबी बाहेर काढताना

सुरुवातीला पाणी उपसणे, गाळ काढणे, चर खोदणे, असे प्रयत्न झाले. मात्र, विहिरीतील पाणी उपसले जात नव्हते . तरीदेखील जेसीबी मालक संभाजी राऊत त्यांनी हार मानली नाही. गेल्या सात दिवसाच्या अथक परिश्रमानंतर दोन पोकलँड आणि एक क्रेनच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. 5 जून) जेसीबी विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. जेसीबीबाहेर काढताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गाळामध्ये फसलेल्या जेसीबीचे लोखंडी भाग वगळता यांचा चुराडा झालेला आहे. कसा का होईना जेसीबी बाहेर निघाल्यानंतर त्याची विमा रक्कम मिळून आपल्याला मदत मिळेल, असा विश्वास जेसीबीचे मालक संभाजी राऊत यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -कोरोनामुक्त रुग्णाकडून प्लाझ्मा डोनेट; नागपूरसह विदर्भातील पहिलीच घटना

ABOUT THE AUTHOR

...view details