महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शुक्रवारपासून पुन्हा धावणार जनशताब्दी एक्सप्रेस - जनशताब्दी एक्सप्रेस वेळापत्रक

मागील वर्षी कोरोनामुळे जालना-मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस तात्पुरती बंद करण्यात आली होती. ही जनशताब्दी एक्सप्रेस आज (शुक्रवार) पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

शुक्रवार पासून पुन्हा धावनार जनशताब्दी एक्सप्रेस
शुक्रवार पासून पुन्हा धावनार जनशताब्दी एक्सप्रेस

By

Published : Jun 25, 2021, 7:43 AM IST

जालना - कोरोनाच्या काळात प्रवासी संख्या घटल्यामुळे तात्पुरती बंद करण्यात आलेली जनशताब्दी एक्सप्रेस आज (शुक्रवार) पासून पुन्हा सुरू होणार आहे. जालना मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.

शुक्रवार पासून पुन्हा धावनार

मागील वर्षी कोरोनामुळे जालना-मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस तात्पुरती बंद करण्यात आली होती. जानेवारी 2021 मध्ये पुन्हा काही दिवस ती धावली. मात्र फेब्रुवारीच्या सुमारास कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने ती परत बंद करण्यात आली होती. ही जनशताब्दी एक्सप्रेस आता आज (शुक्रवार) पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

जनशताब्दीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना रेल्वे क्रमांक 02271 ही छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथून दुपारी 12 वाजून दहा मिनिटांनी निघेल आणि जालना येथे संध्याकाळी 7.45 मिनिटांना पोहोचेल.
  • परतीच्या प्रवासात जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे क्रमांक 02272 जालना येथून सकाळी 8.30 मिनिटांनी निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी 4.20 मिनिटांनी पोहोचेल.

हेही वाचा -राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका; घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details