भोकरदन (जालना)-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व नागरिकांना जनधन खाते आणि आधार लिंक असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील खातेदारांना पोस्टातून पैसे काढता येणार आहेत, अशी माहिती भोकरदनचे उपडाकपाल शेख नासेर अहमद यांनी दिली आहे.
भोकरदन पोस्ट ऑफिसमधून जनधन, राष्ट्रीयकृत बँकांच्या खातेदारानां पैसे काढता येणार - लॉकडाऊन न्यूज
लॉकडाऊन काळात कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून भोकरदन तालुक्यातील जनधन खातेधारक आणि आधार लिंक राष्ट्रीयकृत बँक खातेधारक यांना पोस्ट कार्यालयातून पैसे काढता येणार आहेत.
भोकरदन पोस्ट ऑफिस
जनधन खाते तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील आधार कार्ड लिंक असलेले खात्यातील पैसे काढण्याची सुविधा भोकरदन पोस्ट ऑफिस तसेच भोकरदन तालुक्यातील पोस्ट ऑफिसच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.
भोकरदन तालुक्यातील सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमद यांनी केले आहे. आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगतिले.
Last Updated : May 13, 2020, 5:25 PM IST