जालना- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने आज (शनिवार) आणि उद्या रविवार अशी दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशाला सर्वांनीच प्रतिसाद दिला असून आज जालना शहर कडकडीत बंद होते.
'जनता कर्फ्यू'साठी जालन्यात शनिवारपासूनच कडकडी बंद... हेही वाचा-दिवसभरातील महत्त्वाच्या दहा घडामोडींचा वेगवान आढावा...
बंदबाबत प्रशासनाने आवाहन केले आहे. मात्र, ज्यांनी आपली दुकाने उघडी ठेवली अशा व्यावसायिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करुन दुकाने बंद ठेवण्यासाठी भाग पाडले. उद्या होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शनिवारीच सर्वत्र संचारबंदीसदृश्य परिस्थिती होती. रेल्वेस्थानकावरदेखील शुकशुकाट होता. शहरांमध्ये जीवनावश्यक वगळता बंद पाळण्यात आला.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर जनजागृती करण्यासाठी स्टॉल लावला आहे. मात्र, या स्टॉलवर माहिती देण्यासीठी कोणीच नाही.