जालना- शेरसवार दर्गा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जमील मौलाना यांना अखेर अटक करण्यात आली आहे. शहरातील सर्व्हे नं. 2, 101, 102,103 मधील तब्बल 28 एकर 16 गुंठे जमीन दर्गा सय्यद अहमद शेरसवार यांच्या मालकीची आहे. तर दर्ग्याचे तथाकथित मुतवल्ली सय्यद जमील सय्यद जानिमिया उर्फ जमील मौलाना यांनी शहरातील काही लोकांशी संगनमत करून त्या जमिनीवर भूखंड पाडून मोठ्या प्रमाणात शॉपिंग सेंटर व अन्य बांधकाम केले आहे.
हेही वाचा -'जल है तो कल है', जालन्यातील लोकमान्य गणेश मंडळाने साकराला देखावा
यातून सन 2002 ते 2019 या काळात तब्बल 600 लोकांनी गाळे व भुखंड विक्री करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. यासंदर्भात औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद सिराज अहमद यांनी 27 मे 2019 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.