जालना - रमजानचा पवित्र 'रोजा'मुळे मानवाच्या अंगात असलेल्या वाईट प्रवृतींचा नाश होतो, असे मत औरंगाबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक वाजिद अली खान यांनी व्यक्त केले. जमात-ए-हिंद या संस्थेच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या व्याख्यानमध्ये ते बोलत होते.
रमजानच्या 'रोजा'मुळे वाईट प्रवृत्तीचा नाश होतो - प्रा. वाजेद अली खान - रमजान
रमजानचा पवित्र 'रोजा'मुळे मानवाच्या अंगात असलेल्या वाईट प्रवृतींचा नाश होतो, असे मत औरंगाबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक वाजिद अली खान यांनी व्यक्त केले. जमात-ए-हिंद या संस्थेच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या व्याख्यानमध्ये ते बोलत होते.
![रमजानच्या 'रोजा'मुळे वाईट प्रवृत्तीचा नाश होतो - प्रा. वाजेद अली खान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3401159-thumbnail-3x2-jalna.jpg)
पुढे बोलताना प्राध्यापक वाजेद अली खान म्हणाले, की रोजाच्या माध्यमातून वाईट प्रवृत्ती संपविण्यासाठी एक महिना उपवास केले जातात आणि पुढील अकरा महिने त्याची अंमलबजावणी केली जाते. चौदाशे वर्षांपूर्वी मक्का शहरात दिव्य कुराण उवतरले. यामध्ये मानवाला जगण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. 114 अध्याय आणि 6236 ओव्यांच्या माध्यमातून मानव समाजाला मार्गदर्शन करण्यात आले आहे. असही त्यांनी सांगितलं.
मुळात इस्लाम हा अरबी शब्द आहे. या इस्लामचे तीन अर्थ होतात शांती, सुरक्षितता आणि समर्पण, या तिन्ही गोष्टी अंगी करण्यासाठी रोजा ठेवणे आवश्यक आहे आणि हे समजावून घेण्यासाठी किमान एक वेळा तरी कुराणाचे पठण करावे, असे आवाहनही प्राध्यापक वाजेद अली यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जमात-ए-हिंद संघटनेचे अध्यक्ष शेख मुजीब, शिक्षण विस्तार अधिकारी रवी जोशी, किनोळा येथील स्वामी विवेकानंद आश्रमचे नारायण भुजंग, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमुद, प्रा.पंढरीनाथ साखरे, दिनकर घेवंदे, मिर्झा अन्वर बेग आदींची उपस्थिती होती.