महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना पाणीपुरवठा पाईपलाईनमधून पाण्याची गळती; पाणीपुरवठा लांबण्याची चिन्हे

बावीस दिवसानंतर ज्या भागाचा उद्या पाणीपुरवठा होणार होता त्या भागाचा पाणीपुरवठा आता पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By

Published : May 17, 2019, 4:47 PM IST

पाणीपुरवठा योजनेला गळती

जालना - जालन्याला पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होतो. अंबड येथे जालना नगर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून जालना शहराला पाणीपुरवठा करण्यात येते. अंबड शहरापासून काही अंतरावर लालवाडी पाटीजवळील पाईपलाईनच्या व्हॉल्वमधून पाण्याची गळती सुरू होती मात्र, हा व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाल्याने एन उन्हाळ्यात या पाईपलाईनमधून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणात होणार असून पाणीपुरवठा लांबण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा योजनेला गळती

ही पाईपलाईन गावाच्या रस्त्याजवळूनच गेली आहे. व्हॉल्व आणि रस्त्यापासून जवळच असलेल्या गावाची तहान हा व्हॉल्व भागवत असल्यामुळे आणि गावकऱ्यांना रात्री-बेरात्री पाणी घेऊन जाणे सोपे असल्यामुळे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र आज १७ रोजी सकाळपासूनच या व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या जालना शहरातील नागरिकांना २२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. बावीस दिवसानंतर ज्या भागाचा उद्या पाणीपुरवठा होणार होता त्या भागाचा पाणीपुरवठा आता पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जालना नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी समस्या रोज वाढत वाढतच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details