जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन वारंवार सूचना देत असूनही नागरिक जनता कर्फ्युबाबत गंभीर दिसत नाहीत. मात्र, लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर रुग्णसंख्येचा वाढता वेग पाहता व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचे ठरविले. त्यानुसार आज पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देत कर्फ्यू यशस्वी केल्याचे चित्र आहे.
जालन्यात व्यापाऱ्यांनी घोषित केला तीन दिवसांचा जनता कर्फ्यू - jalna Janata Curfew
प्रशासन वारंवार सूचना देत असूनही नागरिक जनता कर्फ्युबाबत गंभीर दिसत नाहीत. मात्र, लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर रुग्णसंख्येचा वाढता वेग पाहता व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचे ठरविले. त्यानुसार आज पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देत कर्फ्यू यशस्वी केल्याचे चित्र आहे.
जालना शहर तर बंद आहे. त्यासोबत जिल्ह्यात मोंढा या शहरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आज येथेदेखील शुकशुकाट होता. सर्वच दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनीदेखील शहरात फिरुन या बंदचा आढावा घेतला आहे. त्यानंतर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चाही केली. यावेळी व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच यांच्यासह पदाधिकारी श्याम सुंदर लोया, विनीत सहानी, दीपक भुरेवाल, विजय मोटवाणी आदी व्यापाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती.