महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालनाच्या व्यापाऱ्यास बीडमध्ये लुटले; साडेचार लाखाची रोकड लंपास - 2 चोरट्यांवर चोरीचा गुन्हा

Jalna Crime: जालना जिल्ह्यातील एक व्यापारी किराणा दुकानातील खरेदीसाठी आज दुपारी शहरात आले होते. यावेळी जालना रोड परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून लंपास केली आहे. या पिशवीत खरेदीसाठी आणलेले साडे चार लाख रुपये होते. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस Shivaji Nagar Police ठाण्यात अज्ञात 2 चोरट्यांवर चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.

Jalna Crime
Jalna Crime

By

Published : Nov 8, 2022, 10:41 PM IST

बीड: जालना जिल्ह्यातील एक व्यापारी किराणा दुकानातील खरेदीसाठी आज दुपारी शहरात आले होते. यावेळी जालना रोड परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून लंपास केली आहे. या पिशवीत खरेदीसाठी आणलेले साडे चार लाख रुपये होते. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस Shivaji Nagar Police ठाण्यात अज्ञात 2 चोरट्यांवर चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.

अशी घडली घटना विठ्ठल नानासाहेब आर्दड (वय 67, रा.राजटाकली जि.जालना) यांचे जालना जिल्ह्यात 2 किराणा दुकान आहेत. ते किराणा दुकानातील माल खरेदीसाठी महिन्यातून दोन वेळेस बीडमध्ये येत असतात. आज सुद्धा ते खरेदीसाठी दुपारी बीडमध्ये आले होते. जालना रोड परिसरात आल्यानंतर त्यांचे वाहन खराब झाल्यामुळे शहरातील साई पॅलेस परिसरातील एका गॅरेजवर ते थांबले होते. खराब झालेले साहित्य आणण्यासाठी ते रस्त्याने जात असताना, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या 2 चोरट्यांनी विठ्ठल आर्दड यांच्या हातातील कापडी पिशवी हिसका देऊन लंपास केली आहे.

चोरटे मात्र अजून सापडलेले नाही या पिशवीत आर्दड यांनी खरेदीसाठी आणलेले साडे चार लाख रुपये होते. आर्दड यांच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेल्या 25 दिवसात शहरात अशा घटना दोन- तीन झालेले आहेत. परंतु चोरटे मात्र अजून सापडलेले नाहीत. चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांनी शहरात फिरताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details