जालना -तालुका पोलीस ठाण्याचे छतअंगावर पडण्यापर्यंत वाट पालिल्यानंतर अखेर १ मेला पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्यात आले. मात्र, किरकोळ काम बाकी असल्यामुने प्रत्यक्षात सात मेपासून येथे कामकाजाला सुरुवात होईल, शी माहिती पोलीस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे यांनी दिली.
अखेर जालना तालुका पोलीस ठाण्याचे स्थलांतर, ७ मेपासून सुरू होणार कामकाज - shift
सध्या जुना जालना भागातील जुन्या निजाम कालीन इमारतीमध्ये तालुका पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे. २४ एप्रिल ला या पोलीस ठाण्याचे छत कोसळले, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सध्या जुना जालना भागातील जुन्या निजाम कालीन इमारतीमध्ये तालुका पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे. २४ एप्रिल ला या पोलीस ठाण्याचे छत कोसळले, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 23 एप्रिलला लोकसभेची निवडणूक असल्यामुळे सर्व पोलिस कर्मचारी बाहेरगावी कर्तव्यासाठी गेले होते. त्यामुळे या ठिकाणी बसणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी २४ एप्रिलला कार्यालयात उशिरा आल्या. सकाळी ९ वाजता जिल्ह्यातील टपालाची देवाण-घेवाण करण्यासाठी या छताखाली जमणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी उशिरा आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हे छत कोसळले, त्यामुळे या पोलीस ठाण्याचा स्थलांतराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. यापूर्वीही या पोलीस ठाण्याचे स्थलांतर होणार म्हणून चर्चा सुरू झाली होती. मात्र, ती हवेतच विरली. अखेर काल दिनांक १ मेला महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधला आणि तातडीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधिक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, यांच्या उपस्थितीमध्ये तालुका पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्यात आले. मात्र, इथे लागणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ७ मे उजाडणार आहे.