जालना -महसूल उत्पादनात अग्रेसर असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे हे कार्यालय आज निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे या कार्यालयाला बारा कोटींचा फटका बसलेला आहे. त्यात आता कर्मचारीच कोरोनाबाधित आल्याने जे तुरळक नागरिक कार्यालयात जात होते तेही आता भीतीपोटी जाणार नाहीत.
जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण - जालना परिवहन कोरोनाबाधित कर्मचारी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे हे कार्यालय आज निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात आले. कोरोनाबाधित असलेला कर्मचारी हा गेल्या आठ दिवसांपासून कार्यालयात आलेलाच नाही, त्यामुळे काळजीचे कारण नाही. सोमवारपासून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कोठोळे यांनी सांगितले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खासगी दलालांची संख्यादेखील मोठी आहे. पर्यायाने येथे नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामधून हॉटेल, डॉक्टर, झेरॉक्स, नोटरी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना येथे चालना मिळालेली आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनच्या काळात नागरिक इकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे परिवहन विभागाबरोबरच दलालांना देखील याचा फटका बसला. आता याच कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज या कार्यालयात आणि परिसरात शांतता पसरली होती.
कोरोनाबाधित असलेला कर्मचारी हा गेल्या आठ दिवसांपासून कार्यालयात आलेलाच नाही, त्यामुळे काळजीचे कारण नाही. मात्र, खबरदारी म्हणून आज पूर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण केले आहे आणि शासकीय निर्देशाप्रमाणे कार्यालय तीन दिवस बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या आणि आजचा एक दिवस असे तीन दिवस हे कार्यालय बंद राहणार आहे. सोमवारपासून प्रत्येकाने आपापली काळजी घेऊन आणि खबरदारीच्या उपाययोजना करून काम करण्यास हरकत नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कोठोळे यांनी सांगितले.