जालना-गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस असलेल्या दुचाकी वाहनांचा कदीम जालना पोलीस लिलाव करण्याच्या तयारीत आहेत. आठ दिवसांपूर्वीच जुन्या कदीम जालना पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये अशाच जप्त केलेल्या चारचाकी वाहनांना आग लागून त्यात अनेक चारचाकी वाहने जळून खाक झाले आहेत.
142 वाहनांचा लिलाव
गेल्या वर्षानूवर्षे कदीम जालना पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली दुचाकी वाहने पडून आहेत. तसेच अनेक बेवारस वाहनेही येथे आहेत. हे पोलीस ठाणे जुन्या इमारतीमधून नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाले. त्याचसोबत ही पडून असलेली बेवारस वाहने देखील स्थलांतरित करण्यात आली. त्यातील काही वाहने आजही चांगल्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे या वाहनांची ओळख पटवून आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून संबंधिताने वाहन घेऊन जावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केले आहे. जप्त केलेली 183 वाहने पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कदीम जालना पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवलेले आहेत. त्यापैकी 142 वाहनांचा लिलाव होणार आहे.