जालना- जुना जालना भागासाठी असलेल्या 'कदीम जालना पोलीस' ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नशिबी जुनीच इमारत लिहिली आहे. सध्या असलेली इमारत निजाम कालीन आहे. याच सोबत समोरच आणखी एक अशाच पद्धतीची जुनी इमारत होती. जिथे पूर्वी कोषागार कार्यालय आणि त्यानंतर तालुका पोलीस स्टेशन कार्यरत होते. मात्र 24 एप्रिल 2019 ला या निजाम कालीन इमारतीचे छत कोसळले.
जीर्ण झालेल्या निजाम कालीन इमारतीत चालतोय जालना पोलिसांचा कारभार; दुर्घटनेची शक्यता - jalna police station
सध्या असलेली इमारत निजाम कालीन आहे. याच सोबत समोरच आणखी एक अशाच पद्धतीची जुनी इमारत होती. जिथे पूर्वी कोषागार कार्यालय आणि त्यानंतर तालुका पोलीस स्टेशन कार्यरत होते. मात्र 24 एप्रिल 2019 रोजी या निजाम कालीन इमारतीचे छत कोसळले.
सुदैवाने 23 एप्रिलला निवडणूक झाल्यामुळे 24 एप्रिलच्या दिवशी सर्व कर्मचारी उशिरा कामावर आले होते. त्यामुळे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पडलेल्या भिंतीमुळे कोणीही जखमी झाले नाही. याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने या ठाण्याचे स्थलांतर सर्वे नंबर 488 मध्ये असलेल्या प्रयोगशाळेच्या अर्ध्या इमारतीमध्ये केले.
पोलिस ठाण्यात शौचालय देखील नाही
येथील कर्मचाऱ्यांना शौचालयाची व्यवस्थाच नाही. त्यामुळे पुरुष मंडळीची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. आणि एकीकडे स्वच्छ भारत म्हणून पाट्या लावून भिंती रंगवत असलेल्या शासनाच्या या फलका समोरच हे कर्मचारी आपली अडचण मोकळी करत आहेत.