जालना- कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैकाडी मोहल्ला येथे हातभट्टीची दारू बनविण्यात येत असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन मिळाली. या माहितीच्या आधारे मंगळवारी कारवाई करत पोलिसांनी 1 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी हातभट्टीवर धाड टाकत जप्त केला 1 लाख 11 हजारांचा मुद्देमाल - PI Prashant Mahajan
मंगळावरी पोलीस पथकाने हातभट्टीची दारू तयार करण्याच्या ठिकाणी धाड टाकली. या ठिकाणावरून पोलिसांनी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि अन्य साहित्य असा 1 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी हातभट्टीवर धाड टाकत जप्त केला एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल
मंगळावरी पोलीस पथकाने हातभट्टीची दारू तयार करण्याच्या ठिकाणी धाड टाकली. या ठिकाणावरून पोलिसांनी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि अन्य साहित्य असा 1 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कदीम पोलिसांनी हातभट्टीची दारू तयार केल्याप्रकर्णी लक्ष्मीबाई रमेश पवार, कैलास धोंडीराम जाधव, मगन लोकनाथ पवार यांच्यावर कारवाई केली. पोलिसांनी दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले आहे.