जालना - कोरोनाच्या संकटात पोलीस महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या कोरोना योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलिसांची रोज ऑक्सिजन आणि तापमान तपासणी केली जात आहे.
पोलीस अधीक्षकांचे कार्यालय, पोलीस ठाणे किंवा पोलीस चौकी या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची रोज कार्यालयात आल्याबरोबर तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये शरीरातील ऑक्सिजन पातळी आणि तापमान अशा दोन्ही पद्धतीने तपासणी केली जात आहे. या तपासणीच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या जात आहेत. त्यामागे पोलिसाच्या आरोग्याविषयीची माहिती भविष्यातही मिळावी, हा उद्देश आहे.
कोरोनाविरोधात लढाई : जालन्यातील पोलिसांची रोज तपासणी
पोलीस अधीक्षकांचे कार्यालय, पोलीस ठाणे किंवा पोलीस चौकी या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची रोज कार्यालयात आल्याबरोबर तपासणी करण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाने सुधारला कारभार
सुरुवातीच्या काळात पोलीस प्रशासनाबद्दल सर्वत्र नाराजी होती. त्यांना आरोग्याच्या कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या. त्यानंतर सगळीकडून नाराजीचा सूर आल्यानंतर पोलीस यंत्रणेला कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये मास्क, पीपीपी कीट आदींचा समावेश आहे. तसेच ज्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून काम केले, त्यांना प्रोत्साहनपर रोख रक्कमही बक्षीस म्हणून दिले जात आहे. त्यामुळे सध्या पोलीस प्रशासनाबद्दल समाधानाचे वातावरण आहे.