जालना - शहरात टाळेबंदी सुरू झाल्यापासून सोळा विविध प्रकारच्या दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. शहरातील दवा बाजारात वरद ड्रेसेस, मराठवाडा कृषी सेवा केंद्र ,श्रीनिवास एजन्सी, राज एजन्सी, सत्यनारायण ट्रेडर्स, ऋषी किराणा या सात दुकानांमध्ये 18 एप्रिलला शटर उचकून चोरी झाली होती.
लॉकडाऊनची संधी साधत 16 दुकाने फोडणारी टोळी जालना पोलिसांकडून जेरबंद - JALNA ROBBERY
जालना शहरात टाळेबंदी सुरू झाल्यापासून सोळा विविध प्रकारच्या दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
19 एप्रिलला फुले मार्केट येथील साई मोबाइल शॉपी, माऊली किराणा, गजानन किराणा, या दुकानांमध्ये चोरी झाली होती. 24 एप्रिलला भोकरदन नाका येथे साईराम डेली निड्स, प्रतीक ऍग्रो एजन्सी, पानाचे दुकान तर 28 एप्रिलला जुना मोंढा येथील सतीश ट्रेडर्स, टेक्नो सोल्युशन, आदी दुकानांमध्ये चोरी केली होती. अशा एकूण सोळा दुकानांमध्ये चोऱ्या झाल्या होत्या.
संशयित म्हणून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कैकाडी मोहल्ल्यात राहणाऱ्या सचिन बाबू गायकवाड, याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने जवाहर बाग येथे राहणाऱ्या राम सखाराम निकाळजे आणि एक विधीसंघर्ष बालकाला सोबत घेऊन या चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली. तसेच या चोऱ्यांमध्ये लंपास केलेला 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.