महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राम मंदिर निकालाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस यंत्रणा सतर्क - जालना पोलीस सतर्क बातमी

बाबरी मस्जिदचा ढाचा पाडल्यानंतर दंगल उसळली होती. अनेक दिवस संचारबंदी लागू केली होती. अशी परिस्थितीत परत उद्भवू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

राम मंदिर निकालाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस यंत्रणा सतर्क

By

Published : Nov 7, 2019, 9:25 PM IST

जालना - गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादाचा निकाल लवकरच लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणीही केली आहे. पोलीस अधिक्षक चैतन्य हे वारंवार दोन्ही समाजाच्या बैठका घेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नही करत आहेत.

राम मंदिर निकालाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस यंत्रणा सतर्क

हेही वाचा-'सरकारी यंत्रणा वापरून आमदार फोडाफोडी सुरू'

बाबरी मस्जिदचा ढाचा पाडल्यानंतर दंगल उसळली होती. अनेक दिवस संचारबंदी लागू केली होती. अशी परिस्थितीत परत उद्भवू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कामालाही लागली आहे. संवेदनशील भागांची पोलिसांनी पाहणी करुन त्या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. दरम्यान, जुनी पार्श्वभूमी असलेल्या समाजकंटकांना अद्यापपर्यंत ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र, त्यांच्यावर पोलीस यंत्रणा नजर ठेवून आहे.

जिल्ह्यामध्ये बाहेरून कुमक मागविण्यात आली आहे. होमगार्डची देखील विविध ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. काल मुस्लिम समाजाची बैठक घेतल्यानंतर आज गुरुवारी हिंदू समाज संघटनांची बैठक पोलीस अधिक्षकांनी घेतली. या बैठकीला शिवप्रतिष्ठान संघटनेचे जगदीश गौड, हिंदुमहासभेचे धनसिंग सूर्यवंशी, ईश्वर बिल्होरे, बजरंग दलाचे अर्जुन डहाळे, निलेश शर्मा, हिंदुमहासभेचे सचिन शिरसागर तसेच परेश रायठठ्ठा आदींची उपस्थिती होती. हा पोलीस बंदोबस्त पुढील किती दिवस राहणार आहे यासंदर्भात मात्र पोलीस अधिक्षकांनी बोलण्याचे टाळले. परंतु, जोपर्यंत श्रीराम मंदिराचा निकाल हाती येत नाही. तोपर्यंत परिस्थिती अशीच राहील एवढे मात्र नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details