पीर पिंपळगाव (जालना)Jalna Murder Case: जालना जिल्हा सध्या गुन्हेगारीचा हॉटस्पॉट झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे. आज सायंकाळी जालना शहरापासून जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात मित्रां-मित्रामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचे रूपांतर चक्क मारामारीत झाले. (Pir Pimpalgaon Shivar) यामध्ये दिलीप हरिभाऊ कोल्हे (वय 23 वर्ष) या तरुणावर आरोपी अरविंद लक्ष्मण शेळके (वय वर्ष 40, राहणार पीर पिपळगाव ता. जिल्हा जालना) याने गुटखा पुडी मागण्यावरून शाब्दिक बाचावाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीमध्ये झाले. या हाणामारीत दिलीप हरिभाऊ कोल्हे याचा अरविंद लक्ष्मण शेळके याने खून केला.
डॉक्टरांनी केले मृत घोषित:अरविंद लक्ष्मण शेळके आणि त्याचे तीन ते चार साथीदार फरार झाले असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. चारही मित्र दारू प्यायलेले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. जखमी युवक दिलीप कोल्हे यास ग्रामस्थांनी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन या मयत तरुणाचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता दाखल केले. घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती चंदनझीरा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.