जालना - नगरपालिकेच्या प्रांगणातील ( Jalna municipality ) पार्कींग झोनमध्ये उभे असलेल्या घंटा गाडी पैकी एका छोटा हत्ती वाहनाला आग ( Garbage Truck Fire ) लागल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.
जालन्यात घंटागाडीला लागली आग, अग्निशामन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळला पालिकेचे कर्मचारी संदिप वानखेडे यांच्या सदरील बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलास ( Fire Brigade ) खबर दिली असता अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचून जवानांनी आगीवर नियंत्रण ( Firefighters gained control of the fire ) मिळवले.
जालना घंटागाडीला लागली आग साधारण पावणे अकराच्या सुमारास वाहनास आग ( Garbage truck of Jalna Municipality caught fire ) लागल्याची घटना घडली. आग लागलेल्या वाहनाच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या वाहनाला सुध्दा आग लागण्यास सुरवात झाली होती. परंतू अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवून तात्काळ आग विझवल्याने बाजूलाच उभ्या असलेल्या गाड्यांना आगीपासून वाचवण्यास त्यांना यश आले.
वायरिंगची स्पार्कींग होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर सगट,राहूल नरवडे,बाबू गवळी,जाॕन,विठ्ठल कांबळे ई. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.