महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना नगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी गुरुवारी होणार महाचौकशी

देऊळगाव राजा रोड येथील एन. एच. शिंदे या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांकडे जालना पालिकेतील गंभीर प्रकरणाची तक्रार केली होती. याची चौकशी करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजेच 26 जुलैला ही चौकशी होत आहे. विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यासाठी दिनांक 18 जुलैला पाच एक समिती स्थापन केली आहे.

By

Published : Jul 23, 2019, 6:59 PM IST

जालना नगरपालिका

जालना- नगरपालिकेची ढेपाळलेली व्यवस्था, त्यामधून जनतेला होणारे त्रास, अवैध कामे, निविदे शिवाय वाहने भाड्याने घेणे, पाणीपुरवठावर चारशे करोड रुपये खर्च केल्यानंतरही जालनेकरांची पाण्यासाठी होणारी भटकंती आणि चाळीस दिवसांनंतर मिळणारे पाणी अशा अन्य गंभीर तक्रारी बाबत शुक्रवार दिनांक 26 जुलैला जालना नगरपालिकेची महाचौकशी होणार आहे. विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिनांक 18 जुलैला यासाठी पाच एक समिती स्थापन आहे.

तक्रारीतील महत्वाचे मुद्दे

  • शहरातील प्रभाग आंतर्गत करण्यात आलेली रस्त्याचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत .पहिल्याच वर्षात हे रस्ते खराब झाले आहेत. याची सक्षम यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात यावी.
  • दिवाबत्ती संदर्भात शहरांमध्ये नवीन एलईडी पथदिवे लावल्यानंतर जुन्या दिव्यांची ची काय विल्हेवाट लावली याबाबत पालिकेकडे अभिलेख उपलब्ध नाहीत.
  • नव्या जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे, याचीही चौकशी करण्यात यावी .
  • मालमत्ता विभागाच्या विविध करांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची ची रक्कम जमा होऊ शकते मात्र केवळ नगराध्यक्ष श्रीमती संगीता गोरंट्याल यांचे आर्थिक हीत जोपासण्यासाठी ही वसुली केली जात नाही.
  • जालना नगरपालिकेने कुठल्याही निविदा न काढता भाड्याची वाहने घेतले आहेत. या वाहनांवर लाखो रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. याचे याच्या कुठल्याही नोंदी नगरपालिकेकडे नाहीत.
  • नगरपालिका प्रशासन हे श्रीमती संगीता गोरंट्याल यांचे पती माजी आमदार कैलास गोरंट्याल हे चालवत असून प्रशासनात ते ढवळाढवळ करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दहशतीच्या वातावरणात खाली काम करावे लागत असल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे .
  • नगरपालिकेत हाती घेण्यात आलेल्या विविध बांधकामांमध्ये ई-निविदा चा वापर होत असला तरी नगर परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती गोरंट्याल यांचे पती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या दहशतीखाली विशिष्ट ठेकेदारच या निविदा प्रक्रियेमध्ये हे सहभाग घेतात हे उघड झाले आहे. त्यामुळे तेच ते ठेकेदार पुढे येत आहेत.

या आणि अशा प्रकारच्या अन्य गंभीर स्वरूपातील आरोपांबाबत 26 तारखेला ही महाचौकशी आयोजित करण्यात आले आहे .

माजी आमदार कैलास गोरंट्याल

दरम्यान या सर्व प्रकारासंदर्भात नगराध्यक्ष श्रीमती संगीता गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आरोप तथ्यहीन असून आपण चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याच वेळी त्यांचे पती तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी, हा प्रकार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला बदनाम करण्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे षडयंत्र असल्याचे सांगितले. तसेच ही तक्रार अर्जुन खोतकर यांच्या बहिणीचे चिरंजीव यांनी जरी केलेली असली तरी यामागे अर्जुन खोतकर आहेत असा आरोपही त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details