महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jalna Maratha Protest : राज ठाकरेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, हा अमानूष अत्याचार - मनसे - बाळा नांदगावकर

Jalna Maratha Protest : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (३ सप्टेंबर) जालन्यातील मराठा आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय.

Raj Thackeray
राज ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 12:55 PM IST

जालना : Jalna Maratha Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी (१ सप्टेंबर) पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये ३५० हून अधिक आंदोलक आणि सुमारे ३५ पोलीस अधिकारी जखमी झाले. आता याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली आहे.

शरद पवारांनी आंदोलकांची भेट घेतली : शनिवारी शरद पवार यांनी लाठीचार्जदरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली. 'घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असून, पोलिसांना लाठीचार्जची ऑर्डर मुंबईवरून देण्यात आली होती', असा आरोप शरद पवार यांनी केलाय. 'तेथे सर्वकाही सुरुळीत सुरू होतं. पोलिसांना मुंबईवरून सूचना मिळाल्या आणि त्यांनी थेट आंदोलकांवर लाठीचार्ज केला', असं शरद पवार म्हणाले.

राज ठाकरेंचा आंदोलनाला पाठिंबा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. 'आमचा या उपोषणाला पाठिंबा आहे', असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलाय. 'हा अमानुष अत्याचार आहे', असं ते म्हणाले.

आंदोलन बिघडवण्यासाठीचं षडयंत्र असू शकतं : 'आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांना लाठीचार्ज करण्याची काय गरज होती? हा अमानुष अत्याचार आहे. संबंधित पोलीस अधीक्षकांना ताबडतोब बडतर्फ करा. आंदोलकांवर सरसकट गुन्हे दाखल आहेत, ते मागे घ्या', असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. 'हे आंदोलन बिघडवण्यासाठीचं षडयंत्र असू शकतं. जाळपोळ दुसऱ्यांनीच केली असू शकते', असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. Jalna Maratha Protest : लोकांच्या केसाला हात लावला तर..; उद्धव ठाकरेंचा राज्यसरकारला इशारा
  2. Raosaheb Danve On Lathicharge: वातावरण पाहून परिस्थिती हँडल केली, पण जालना पोलिसांचा लाठीचार्ज चुकीचाच- रावसाहेब दानवे
  3. Sharad Pawar PC : मुंबईच्या सूचनेवरून मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - शरद पवारांचा घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details