महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 24, 2019, 11:09 AM IST

ETV Bharat / state

जालना लोकसभेसाठी ६४.०५ टक्के मतदान, वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर..?

जालना लोकसभेसाठी मंगळवारी रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार ६४.०५ टक्के मतदान झाले आहे.

जालना लोकसभा

जालना- जालना लोकसभेसाठी मंगळवारी रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार ६४.०५ टक्के मतदान झाले आहे. दुपारच्या टप्प्यात वाढलेले मतदान नक्की कोणाच्या पारड्यात पडले हे पाहण्यासाठी तब्बल एक महिना उमेदवारांसह मतदारांनाही वाट पाहावी लागणार आहे.

जालना लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये प्रमुख लढतीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे या तिघांमध्ये ही लढत आहे. २०१४ मध्ये देखील या तिघांमध्ये लढत होऊन रावसाहेब दानवे यांचा विजय झाला होता. यावेळी कोणाचा विजय होईल हे पाहण्यासाठी मात्र २३ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आज झालेल्या मतदानामध्ये १२ लाख २ हजार ९५८ मतदारांनी मतदानाची ६४. ०५ एवढी टक्केवारी गाठली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details