जालना- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा एकदा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. जालना हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. येथून दानवे यांनी पाचव्यांदा विजय मिळविला आहे. शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची मनधरणी केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीची अर्धी लढाई जिंकल्याचे बोलले जात होते.
जालना लोकसभा : भाजपचे रावसाहेब दानवे विजयी, कार्यकर्त्यांचा जल्लोष - BJP
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा एकदा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. जालना हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. येथून दानवे यांनी पाचव्यांदा विजय मिळवला आहे.
दानवे यांचा विजय दिसत असतानाच पत्रकारांना प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे म्हणाले, ही सर्व मतदानयंत्राची करामत आहे. आमचा पहिल्यापासूनच ईव्हीएम मशीनवर विश्वास नव्हता. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आम्ही यापुढेही जनतेची सेवा करू.
- महत्वाच्या घडामोडी -
- 03.23 pm - भाजपचे विद्यमान खासदार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे १ लाख ५९ हजार ५०९ मतांनी आघाडीवर आहेत.
- 03.15 pm -आतापर्यंत भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना ३ लाख २० मते, विलासऔताडे यांना १ लाख ४० हजार ५११ मते आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वानखेडे यांना २५ हजार ९८४ मते मिळाली आहेत.
- 01.24 pm-आतापर्यंत भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना १ लाख ७८ हजार १०९ मते, औताडे यांना ८३ हजार ९५८ मते, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वानखेडे यांना १६ हजार ७७२ मते मिळाली आहेत.
- 01.23 pm -भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे ९४ हजार ९११ मतांनी आघाडीवर.
- 11.40 am - भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे ३६ हजार ८२२ मतांनी आघाडीवर
- 10.25 am -पहिल्याफेरी अखेर भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे ३० हजार ७५९ मतांनी आघाडीवर, औताडेंना १० हजार ४५१ मते तर वंचित बहुजन आघाडीचे वानखेडे यांना ३ हजार ६५४ मते मिळाली आहेत
- 9.29 am - भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे २ हजार ८७१ मतांनी आघाडीवर
- 8.35 am - भाजपचे विद्यमान खासदार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आघाडीवर
- 7.59 am - मतमोजणी ठिकाणी जामर बसवल्याने कार्यकर्ते आणि मीडियात नाराजी
- 7.59 am - जामर बसवल्याने उमेदवारांची अपडेट माहिती पाठविण्यासाठी कार्यकर्ते आणि पत्रकारांना येत आहे अडचण.
जालना मतदारसंघातून मागील ६ निवडणुकांपासून भाजपचा उमेदवार निवडून येतो. त्यापैकी ४ वेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या ठिकाणाहून निवडून आले आहेत. यावेळी ते पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विलास औताडे पुन्हा एकदा शड्डू ठोकूण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. मागच्या निवडणुकीत बसपकडून निवडणूक लढवणारे डॉ. शरदचंद्र वानखेडे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. तर बसपकडून महेंद्र सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता यामध्ये दानवे चकवा देत दिल्ली गाठणार की औताडे त्यांना चितपट करत खासदार होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.