जालना- हिंदू संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेकडे पाहिले जाते. यादिवशी केलेली खरेदी आणि सत्कर्म हे चिरकाल टिकतात, असा समज आहे. तसेच अक्षय तृतीयेला जलदानाचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कुंभारांनी तयार केलेल्या केळी ना (लहान मोठ्या दोन मडक्यांना ) अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप महत्त्व आहे. या केळीच्या माध्यमातून जलदान केल्या जाते.
कोरोनाचा फटका; व्यावसायिकांना गल्लीमध्ये जाऊन विकावे लागतात अक्षय्य तृतीयेचे 'जलकुंभ' - jalna akshay trutiya
हिंदू संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहिले जाते. यादिवशी केलेले सत्कर्म चिरकाल टिकतात, असा समज आहे.
केळी विक्रीतून कुंभारांची उपजीविका सुरू राहते. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कुंभारांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. ग्राहक नसल्यामुळे भाव वाढविता येत नाहीत आणि ग्राहकांचा अंदाज नसल्यामुळे किंवा ग्राहक कमीच मिळतील असे अपेक्षित धरून उत्पादन ही करता येत नाही. विशिष्ट प्रकारचे तयार केलेले हे छोटे माठ वर्षभर कामाला येत नाहीत. त्यामुळे जर त्या विकल्या गेल्या नाहीत, तर घरात जागा रोखता. अशी कोंडी सध्या कुंभार समाजाची झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जो भाव होता, त्यापेक्षाही कमी भावात हे माठ विकण्यासाठी कुंभार समाज तयार झाला आहे. ग्राहक आपल्याकडे येतील ही अपेक्षा न ठेवता आपणच ग्राहकांच्या दारापर्यंत गेले पाहिजे म्हणून दुचाकीवर केळी ठेवून कुंभार समाज कॉलनीमध्ये फिरत आहे.