महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवीगाळ प्रकरणात सभागृहाचे साडेतीन तास 'पाण्यात' - मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा

जिल्हा परिषदेच्या ताडहादगाव गटाच्या सदस्या श्रीमती गंगासागर पिंगळे यांच्या पतीने अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. हा सर्व प्रकार मिटवण्यात सभागृहाचे साडेतीन तास वाया गेले आहेत.

संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

By

Published : Sep 11, 2019, 10:35 PM IST

जालना - जिल्हा परिषदेच्या ताडहादगाव गटाच्या सदस्या श्रीमती गंगासागर पिंगळे यांच्या पतीने अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. हा सर्व प्रकार मिटवण्यात सभागृहाचे साडेतीन तास वाया गेले आहेत. यानंतर कर्मचारी संघटना तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत तोडगा काढून तहकूब केलेल्या सभेचे कामकाज साडेपाच वाजता पुन्हा सुरू करण्यात आले.

संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ताडहादगाव गटाच्या महिला सदस्या गंगासागर पिंगळे यांच्या पतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.बी. मराठे यांना केबिनमध्ये जाऊन शिवीगाळ केली. तसेच यावेळी बूट उगारण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे दुपारी दोन वाजता सुरू होणारी सभा चार वाजता सुरू झाली.

हेही वाचा जिल्हा परिषद महिला सदस्याच्या पतीची बांधकाम अधिकाऱ्याला शिवीगाळ; कर्मचाऱ्यांचा सभात्याग

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी कर्मचाऱ्यांची पाठराखण करून पिंगळे यांनी सभागृहात येऊन माफी मागावी; तसेच यापुढे असा प्रकार टाळण्यासाठी ठराव घेण्याची मागणी केली. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पिंगळे यांची बाजू घेऊन या प्रकरणावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच संबंधित विषय सभागृहाच्या बाहेरचा असल्याने तो बाहेरच मिटवावा, अशी मागणी केली. अधिकारी सहा महिने काम करत नसतील तर यामध्ये जनतेची काय चूक? असे सांगून अधिकारी जागेवर बसत नसल्याच्या तक्रारी केल्या. मात्र, दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.

हेही वाचा जालन्यात शेतात झोपलेल्या वृद्धाची डोक्यात दगड घालून हत्या, कारण अस्पष्ट

जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी व जिल्हा परिषद अध्यक्षांची बैठक झाल्यानंतर हे प्रकरण मिटले. परंतु, यामध्ये सभागृहाचा मोलाचा वेळ वाया गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details