जालना-जळगाव रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशनचे विमानातून सर्वे - फायनल लोकेशन सर्वे
रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जालना जळगाव रेल्वे मार्गाचा "फायनल लोकेशन सर्वे" केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजुरी दिल्यानंतर जालना ते जळगाव 174 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग केला जाणार आहे. त्याच्या सर्वेचे काम भौतिकदृष्ट्या सुरुच आहे. त्यासोबतच आता हवाई सर्वेला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला येथील विमानतळावरून या सर्वेला सुरुवात करण्यात येणार आहे. विमानाद्वारे रडारचा वापर करुन हवाई सर्वे केला जाणार आहे. हे विमान एका दिवसाला 50 किलोमीटरचा सर्वे करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्वेला गती मिळणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. 14 ते 17 मे अशा चार दिवसांत हा हवाई सर्वेक्षण केल्या जाणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे.
जालना -रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जालना जळगाव रेल्वे मार्गाचा "फायनल लोकेशन सर्वे" केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजुरी दिल्यानंतर जालना ते जळगाव 174 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग केला जाणार आहे. त्याच्या सर्वेचे काम भौतिकदृष्ट्या सुरुच आहे. त्यासोबतच आता हवाई सर्वेला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला येथील विमानतळावरून या सर्वेला सुरुवात करण्यात येणार आहे. विमानाद्वारे रडारचा वापर करुन हवाई सर्वे केला जाणार आहे. हे विमान एका दिवसाला 50 किलोमीटरचा सर्वे करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्वेला गती मिळणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. 14 ते 17 मे अशा चार दिवसांत हा हवाई सर्वेक्षण केल्या जाणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे.