जालना -जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अर्चना भोसले यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेऊन जालन्यातदेखील काळजी घेण्यात येत आहे. कोरोनाबाधितांसाठी दोन इमारती राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नवीन बांधकाम केलेली इमारत आणि आणि लसीकरण करण्यात आलेले परिचर्या प्रशिक्षण केंद्राची इमारत या दोन्ही इमारतीमध्ये सुमारे अडीचशे खाटा या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-महाराष्ट्र कोरोना अपडेट : रुग्ण संख्येत वाढ; मंगळवारी 3663 नवीन रुग्ण, 39 मृत्यू
सामान्य रुग्णालय पुन्हा मूळ जागी स्थलांतरित-
सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या जुन्या इमारतीमधील हे रुग्णालय काही महिन्यांपूर्वीच गांधीचमन येथील स्त्री रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या इमारतीमध्ये स्थलांतरित केले होते. मात्र रुग्णांचीआणि प्रशासनाची होणारी हेळसांड पाहता हे रुग्णालय पुन्हा सामान्य रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये 'जैसे थे' सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे याच परिसरात सामान्य रुग्णांसाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांसाठी सेवा उपलब्ध होणार आहे.