जालना - कोरोनाच्या सावटाखाली गणपती विसर्जनाला जालन्यात उत्साहात सुरुवात झाली होती. शहरातील मोतीबाग तलाव परिसरात नगर परिषदेच्यावतीने गणपती विसर्जनाची तयारी करण्यात आली होती. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मोतीबाग परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी अग्निशामन विभागाच्या चार टीम तलाव परिसरात सज्ज होत्या. जालना शहरातील नवयुवक गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीची आरती व पूजा अर्चना करून खोतकर दांपत्याच्या हाताने मानाच्या गणपतीला निरोप देण्यात आला. दरम्यान, नियमाचा भंग केल्या प्रकरणी गणेश मंडळावर पोलीस अधीक्षकांनी दिले कारवाईचे आदेश दिले आहेत.
नगर परिषदेकडून चोख बंदोबस्त -
जालना नगर परिषदेच्यावतीने मोतीबाग तलाव परिसरात गर्दी टाळण्यासाठी शहरात गणपती मूर्तींचे संकलन केल्या गेले. संकलित केलेल्या गणपती मूर्ती वाहनाच्या साहाय्याने मोतीबाग तलाव परिसरात आणून विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करून हे विसर्जन केल्या. यासाठी नांदेड येथील गोदावरी जीवरक्षक दलाच्या टीमची मदत घेतली होती. या कामासाठी नगरपरिषदेचे 400 कर्मचारी अधिकारी राबत होतो. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मोतीबाग परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
खोतकर दांपत्याच्या हाताने मानाच्या गणपतीला पूजा अर्चना करून निरोप -