जालना - तरुणाकडून दोन लाख रुपये घेऊन विवाह लावला. नंतर दहा दिवस संसार केला. अन् परत आपल्या पहिल्या पती व आई वडिलांकडे पळून जाण्याच्या ( woman arrested for cheating on second husband ) तयारीत असलेल्या नववधूला भोकरदन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, या प्रकरणातील नऊ जणांविरुद्ध भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला ( bhokardan police arrested woman ) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सोयगाव देवी मधील रावसाहेब भाऊसाहेब सहाणे ( वय 25 ) हा तरुण नेवास्यातील खाजगी कंपनीत कामाला आहे. या तरुणाच्या विवाहासाठी नातेवाईकाने रमेश शेळके यांच्या मध्यस्थीने एक मुलगी पहिली. रमेशने सोनी वानखेडे नावाची मुलगी असून, ती आश्रमात राहते. तसेच, लग्न करायचे असल्यास तिला २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. मुलगी मिळत नसल्याने रावसाहेबांचे नातेवाईक लग्नास तयार झाले. त्यानंतर, २४ जून रोजी वाडी येथील गणपती मंदिरात रावसाहेबचा विवाह सोनी वानखेडे हिच्या सोबत लावून देण्यात आला. यावेळी लग्नाला मुलीच्या आईसह आदी नातेवाईकांची उपस्थिती होती.
लग्न लावल्यानंतर वर पक्षातर्फे त्यांना 2 लाख रुपये देण्यात आले. लग्नानंत रावसाहेब आणि सोनी हे दाम्पत्य सोयगाव देवी येथे आले. गावातील भावबंधाच्या उपस्थितीत पुन्हा 25 जून रोजी देविदास बाबा यांच्य मठावर नवदाम्पत्याचा दुसऱ्यांदा विवाह लावण्यात आला. दरम्यान, लग्नानंतर सोनी एकदा माहेरी जाऊन आली. परत आल्यानंतर तिने रावसाहेबला मी पुन्हा एकटीच माहेरी जात आहे, असे सांगितले.