महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीजतंत्री तारतंत्रीला सेवेत सामावून घ्या; जालना जयहिंद इलेक्ट्रिकल्स संस्थेची मागणी - company

आयटीआय झालेल्या इलेक्ट्रिशियन वायरमन बेरोजगारांना तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या कंत्राटी कामगारांना महाविद्युत वितरण कंपनीत व पारेषण कंपनीत विनाअट कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, आयटीआय इलेक्ट्रेशियन वायरमन झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना शिकाऊ उमेदवार म्हणून सामावून घेण्यात यावे.

जालना

By

Published : Mar 3, 2019, 10:16 PM IST

जालना - औद्योगिक प्रशिक्षण केंद्राद्वारे वीजतंत्री, तारतंत्री उत्तीर्ण झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना तत्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच तातडीने नोकर भरती करावी, अशी मागणी जालना जयहिंद इलेक्ट्रिकल्स स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्यावतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.

जालना

यावेळी बोलताना संचालक बाबासाहेब वानखेडे म्हणाले, की आयटीआय झालेल्या इलेक्ट्रिशियन वायरमन बेरोजगारांना तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या कंत्राटी कामगारांना महाविद्युत वितरण कंपनीत व पारेषण कंपनीत विनाअट कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, आयटीआय इलेक्ट्रेशियन वायरमन झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना शिकाऊ उमेदवार म्हणून सामावून घेण्यात यावे. तसेच महाविद्युत वितरण कंपनी व पारेषण कंपनीमध्ये अपघाती निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे. या मागणीसह शहीद जवान व माजी सैनिकांना वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी केली.

यासोबत आयटीआय कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना मीटर रिडींगची कामे तसेच विज बिल वाटपाचे कामेही संस्थेला देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश वानखेडे यांच्यासह बाबासाहेब वानखेडे, सुधाकर चव्हाण, मकरंद वानखेडे, शरद लहाने, उमेश अंभोरे, सचिन वानखेडे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details