महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही इफेक्ट : बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार निलंबित - ईटीव्ही इफेक्ट , तहसीलदार श्रीमती छाया पवार निलंबीत

बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार या कोरोनाचे रेडझोन असलेल्या औरंगाबादमधून ये-जा करत आहेत. या तहसीलदारांवर कारवाई कोण करणार? अशा आशयाची बातमी मंगळवारी "ईटीव्ही" ने प्रकाशित केली होती. या घटनेची गंभीर दखल घेतल जिल्हाधिकाऱ्यांनी छाया पवार यांना निलंबीत केले आहे.

jalna district collector suspended to  badnapur tehsildar Chhaya Pawar
बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार निलंबीत

By

Published : Apr 30, 2020, 9:50 PM IST

जालना - बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार या कोरोनाचे रेडझोन असलेल्या औरंगाबादमधून ये-जा करत आहेत. या तहसीलदारांवर कारवाई कोण करणार? अशा आशयाची बातमी मंगळवारी "ईटीव्ही" ने प्रकाशित केली होती. तसेच तहसीलदार छाया पवार यांच्या वाहनाचे जालना-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या वरुडी चेक पोस्ट येथून जालन्यात प्रवेश करतानाचे व्हिडिओ चित्रीकरणही ईटीव्हीने केले होते. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने आज (गुरुवार) तहसीलदार श्रीमती छाया पवार यांना निलंबित केले आहे.

कारवाईचे पत्र

तहसीलदार छाया पवार यांच्यावर रेड झोनमधून ये-जा करणे, याचसोबत अन्य कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे बरेच रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे औरंगाबादचा समावेश रेडझोनमध्ये झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये औरंगाबाद येथून ये-जा केल्यास जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड-19 विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने तहसीलदार, बदनापूर यांनी मुख्यालयात उपस्थित राहून अत्यावश्यक कामे नियमितपणे पार पाडणे आवश्यक होते. मात्र, तहसीलदार, बदनापूर मुख्यालयी राहत नसल्यामुळे कोव्हीड-19 बाबतचे विविध अहवाल वरिष्ठ कार्यालयास विहीत कालावधीमध्ये सादर न करणे, शासकीय कामात दुर्लक्ष करणे, दुष्काळी अनुदान मागणीत अनियमितता, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात दुर्लक्ष, अवैध गौणखनिज वाहतीक प्रकरणात अनियमितता, गौण खनिजाचे अनाधिकृत वाळूसाठे व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणे, शासकीय वसुलीमध्ये दुर्लक्ष करणे या कारणावरुन बदनापुरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांना आज (दि. 30 एप्रिल, 2020) जिल्हाधिकारी, जालना यांनी निलंबित करत अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे.

बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार निलंबीत

निलंबनाच्या काळामध्ये श्रीमती पवार यांना उप विभागीय अधिकारी कार्यालय, जालना हे मुख्यालय देण्यात आलेले असून तहसीलदार , बदनापूरचा पदभार पुढील आदेशापर्यंत नायब तहसीलदार (निवडणूक) दिलीप शेनफड सोनवणे यांच्याकडे सोपवण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details