जालना- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या उमेदवारांमध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचेही नाव आहे. जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सामान्य मतदारांच्या रांगेमध्ये उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
रांगेत उभा राहून जिल्हाधिकार्यांनी बजावला मतदानाचा हक्क - औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ
दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या 178 मतदान केंद्रावर रांगेमध्ये उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. सामान्य मतदाराप्रमाणेच जिल्हाधिकारी बिनवडे यांनी येऊन मतदान केले.
मतदान केंद्र क्रमांक 178
दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या 178 मतदान केंद्रावर रांगेमध्ये उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. सामान्य मतदाराप्रमाणेच जिल्हाधिकारी बिनवडे यांनी हे मतदान केले. मतदान झाल्यानंतर 'ईटीव्ही'सोबत बोलताना जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले की, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 74 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया सध्या सुरळीत आहे आणि शेवटपर्यंतही सुरळीत राहणार आहे. मतदारांची काळजी घेण्यासाठी कोविड-१९ च्या सर्व उपाययोजनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. मतदारांना बोटाला लावण्यासाठी जांभळ्या रंगाच्या शाईचे पेन देखील देण्यात येत आहेत. जेणेकरून मतदारांना कोरोनाची भीती वाटणार नाही. त्यामुळे मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.