जालना - अनिल कपूरचा नायक पिक्चर बहुतांश लोकांनी पाहिला आहे. एक दिवसाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना असलेल्या अधिकारांची झालेली जाणीव आणि या जाणिवेतून केलेली कामे ही सर्वांनाच आठवतात. त्यासोबत त्यांच्यासोबत असलेले टाइपयटर त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच खट-खट वाजत टाईप होणारे आणि समोरच्याला मिळणारे आदेश हे देखील प्रकर्षाने जाणवणारी बाब होती. अशीच काही परिस्थिती आज सकाळी जुना जालना भागात पाहायला मिळाली. नायकच्या भूमिकेत होते तहसीलदार श्रीकांत भुजबळ. आणि त्यांना मदतीला होते जालना पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर आणि कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन. या तिन्ही विभाग प्रमुखांनी आज सकाळीच जालन्यात दौरा काढला.
जालन्यात प्रशासनाचा बडगा...'फाड रे ती पावती' म्हणत तहसीलदार रस्त्यावर - tehsildar jalna
अनिल कपूरचा नायक पिक्चर बहुतांश लोकांनी पाहिला आहे. एक दिवसाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना असलेल्या अधिकारांची झालेली जाणीव आणि या जाणिवेतून केलेली कामे ही सर्वांनाच आठवतात. याच सिनेमाचा प्रत्यय येणारी घटना जालन्यात घडलीय. फाड रे ती पावती म्हणत तहसीलदारांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उचलला आहे.
काल जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक, सामाजिक संस्था, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या सर्वांच्या बैठका झाल्या. आणि सर्वांनीच कोरोना वाढण्याचे प्रशासनावर खापर फोडत कारवाई करत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आज सकाळीच हे तीनही अधिकारी जुना जालना भागातील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी बाहेर पडले. दुचाकीस्वारांना पकडून सोशल डिस्टन्स न पाळल्यामुळे दोनशे रुपये तर मास्क न लावणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपयांचा दंड आकारला. रस्ता असो दुकान असो किंवा एखादे मोठे प्रतिष्ठान असो नीट घुसायचे तिथली परिस्थिती पाहायची आणि आणि तोंडाला मास्क नसेल तर सोबत असलेल्या सहकाऱ्यांना 'फाड रे याची पावती' असा आदेश द्यायचा. तीनही अधिकारी सोबत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याची संधी सोबतच्या कर्मचाऱ्यांना मिळाली नाही आणि आणि पावती घेणाऱ्याला देखील काहीच बोलता आले नाही. त्यामुळे निमुटपणे एका हातात पैसे आणि दुसऱ्याच पावती मिळायला लागली.