जालना - कोरोना बाधितांच्या संख्येत सतत चढ-उतार सुरू असताना रविवारी एकाच दिवशी १० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा १० ने वाढला आहे. जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 35 झाली आहे.
जालना शहरातील दोन दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच दवाखान्यातील दोन कर्मचारी, घनसावंगी तालुक्यातील पीरबेगवडी येथील सहा, घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील एक आणि अंबड तालुक्यातील कानडगाव येथील एक, अशा एकूण दहा रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जालनाकरांची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा विळखा.. जालन्यात एकाच दिवशी १० नवे कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्याचा आकडा ३५ वर - जालना बातमी
जालन्यात रविवारी एकाच दिवशी कोरोनाबाधितांची संख्या १० ने वाढून एकूण आकडा ३५ वर पोहोचला आहे. जालना जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्यामुळे आता कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव करायला सुरूवात केली आहे.
जालन्यात एकाच दिवशी १० नवे कोरोना पॉझिटिव्ह
जालना जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्यामुळे आता कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव करायला सुरूवात केली आहे.