महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jalna Rape Case : पाच वर्षानंतर चिमुरडीला मिळाला न्याय; बलात्कार करणाऱ्या नराधमास २० वर्षे कैदेची शिक्षा - Jalna conviction in pocso

खाऊचे आमिष दाखवून 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या ( Jalna Rape Case ) एका आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 20 वर्ष सश्रम कारावास आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विनोद पैठणकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Jalna Rape Case
जिल्हा आणि सत्र न्यायालय जालना

By

Published : Jul 26, 2022, 5:03 PM IST

जालना -खाऊ देण्याचे आमिष दाखवून 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना जालन्यात ( Minor girl Rape in Jalna ) घडली होती. आज पाच वर्षांनी त्या चिमुरडीला न्याय मिळाला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षाचा सश्रम कारावास आणि 1 लाखांच्या दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.

जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल -खाऊचे आमिष दाखवून 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 20 वर्ष सश्रम कारावास आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विनोद पैठणकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एक लाखांचा दंड न भरल्यास आणखी 3 वर्ष सश्रम कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले आहे.

कदीम पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल - 12 डिसेंबर 2017 रोजी शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी 6 ते 8.30 वाजेच्या दरम्यान आरोपी विनोद पैठणकर हा 4 वर्षाच्या मुलीला खाऊ देण्याचं आमिष दाखवून मोटारसायकल वरून मुक्तेश्वर तलाव परिसरात घेऊन गेला, आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निकाल देत आरोपी विनोद पैठणकर याला 20 वर्ष सश्रम कारावास आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने एक लाखांचा दंड न भरल्यास आणखी 3 वर्ष सश्रम कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -Shinde Govt : ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती देत शिंदे सरकारचा नव्या जीआरचा धडाका, काढले 538 जीआर

ABOUT THE AUTHOR

...view details