जालना -उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली आहे. गेल्या 10 दिवसांत 9 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. त्याविरोधात आता काँग्रेसच्या वतीन आंदोलन देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यातही इंधन दरावाढीविरोधात आज आंदोलन केले ( Congress Agitation Against Rising Fuel Prices ) आहे.
आंदोलनातही वाद - जालन्यात महाविकास आघाडी नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात विविध स्थानिक मुद्द्यांवरून चांगलाच वाद पेटला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांचा वाद महागाई वरून झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने उघड झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने आंदोलन केले. त्यांनतर आज काँग्रेसने महागाईचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकार विरोधात आंदोलन करून पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.