जालना - राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या (गुरुवारी) जाहीर होणार आहे. गुरुवारी दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार असून राज्याचे नवे कारभारी ठरणार आहेत. राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्ह्यापैकी एक म्हणजे जालना जिल्हा. या जिल्ह्यात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत. 2014 मधील विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल बघितले तर भाजपने तीन, राष्ट्रवादीने एक आणि शिवसेनेने एक जागा जिंकलेली आहे.
- जालना विधानसभा मतदारसंघ क्रमांक 101
विद्यमान आमदार -अर्जुन खोतकर (शिवसेना)
मुख्य लढत -शिवसेनेचे अर्जुन खोतकर विरुद्ध काँग्रेसचे कैलास गोरंट्याल
1990 पूर्वी एक अपवाद वगळता जालना मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता. 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर झालेल्या सलग सहा निवडणुकींपैकी दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि चार वेळेस शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले. 2014 मध्ये चौरंगी लढतीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले तरी त्यांचे मताधिक्य केवळ 296 मतांचे एवढे कमी राहिले.
2014 जालना विधानसभा निवडणूक निकाल
अर्जुन खोतकर (शिवसेना) - 45078 मतं
कैलास गोरंट्याल (काँग्रेस) - 44782 मतं
अरविंद चव्हाण (भाजप) - 37591 मतं
अब्दुल रशीद (बसपा) - 36350 मतं
जालना विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार संख्या 2 लाख 90 हजार 207 एवढी आहे.
- परतूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 99
विद्यमान आमदार - बबनराव लोणीकर (भाजप)
मुख्य लढत -भाजपचे बबनराव लोणीकर विरुद्ध काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया
जालना जिल्ह्यातील परतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. १९६२ पासून काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व होते, मात्र १९९९ पासून भाजपने येथे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातून बबनराव लोणीकर हे १९९९, २००४ आणि २०१४ असे तीन वेळा निवडून आलेले आहेत.
मतदारांची संख्या
पुरुष – १,४१,४८२
महिला – १,२६,०६७
एकूण मतदान – २,६७,५४९
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) बबन लोणीकर, भाजप – ४६,७६६
२) सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेस – ४२,४६६
३) बाबासाहेब आकात, मनसे – ३७,३३५
४) निवास चव्हाण, अपक्ष – २४,३७१
५) सोमनाथ साखरे, शिवसेना – १८,९१२
- घनसावंगी विधासभा मतदारसंघ
विद्यमान आमदार - राजेश टोपे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
मुख्य लढत -राष्ट्रवादीचे राजेश टोपे विरुद्ध शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण