महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना : आव्हाना गावातून सिल्लोडला जाणारे सर्व रस्ते बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

भोकरदन तालुक्यातील आव्हाना गावातून सिल्लोड शहरासह औरंगाबादमध्ये जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा रेड झोनमध्ये आलेला आहे. तर, दुसरीकडे जालना जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण नाहीत. याच कारणामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आव्हाना गावातून सिल्लोडला जाणारे सर्व रस्ते बंद
आव्हाना गावातून सिल्लोडला जाणारे सर्व रस्ते बंद

By

Published : May 1, 2020, 3:13 PM IST

जालना- भोकरदन तालुक्यातील आव्हाना गावातून सिल्लोड शहरासह औरंगाबादमध्ये जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा रेड झोनमध्ये आलेला आहे. तर, दुसरीकडे जालना जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण नाहीत. याच कारणामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील आव्हाना हे गाव जिल्ह्याच्या सीमेवर असून आव्हाना दहीगाव मार्ग, आव्हाना मनेरी मार्ग, आव्हाना घारेवाडी मार्ग, आव्हाना बंगला मार्ग, आव्हाना ठालेवाडी मार्ग या रस्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये प्रवेश करता येतो. त्यासाठी, हे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. सर्व रस्ते कोरोना रक्षक आणि पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्या उपस्थितीत बंद करण्यात आले.

आव्हाना गावातून सिल्लोडला जाणारे सर्व रस्ते बंद

यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या गावातील सर्वच नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी घरातच राहावे, घराबाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, गावस्तरावर कोरोना रक्षक करत असलेल्या कामाला सहकार्य करावे. तसेच कोणीही जिल्ह्याची सीमा ओलांडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करु नये, किंवा औरंगाबाद जिल्ह्यातून कोणालाही जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश करू देऊ नये.

सिल्लोड शहरासह औरंगाबादमध्ये जाणारे रस्ते बंद

आव्हाना गावात अॅड. अबरार शेख यांनी गो कोरोना नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरु केलेला आहे. त्यामध्ये कोरोना रक्षक व पदाधिकारी तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींना अॅड करण्यात आले आहे. गावात कोणी नवीन व्यक्ती आला. अथवा शासन नियमांचे पालन होत नसल्यास त्यावर कळविले जाते. लगेचच त्याठिकाणी कोरोना रक्षक व पदाधिकारी जातात व योग्य ती कारवाई केली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details