जालना - सध्या संपूर्ण देशभरातच लोकसभा निवडणुकीचे वातावरण जबरदस्त तापलेले दिसत आहे. यातच आता जालना वकील संघदेखील निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. वकील संघातर्फे किशोर साहेबराव राऊत हे लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. गुरुवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर केला.
आता जालना वकील संघही लोकसभेच्या रिंगणात - advocate
लोकसभा मतदारसंघात वकील संघ देखील निवडणूक रिंगणात उतरला आहे. किशोर साहेबराव राऊत हे लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. आज (४ एप्रिल) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर केला आहे.
किशोर राऊत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरत असल्याचे शपथपत्रात लिहिले आहे. सुशिक्षित लोकांना निवडणुकीच्या प्रवाहात आणणे, हा आपला मुख्य उद्देश असणार आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी वकील मंडळींचा आणि डॉक्टरचा एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून आपली यंत्रणा राबवून आपण मतदारांमध्ये जनजागृती केली आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.
ही सर्व मंडळी निश्चितच आपल्या पाठीशी उभी राहणार आहे. त्यामुळे आपला विजय नक्कीच होणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.