जालना- महाराष्ट्र शासनाने अभ्यासक्रम बदलल्यानंतर 'जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था' अर्थात (DIET) या संस्थेकडून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी संस्थेतील काही अधिकारी तहसीलकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या संस्थेचा कारभार केवळ एक कर्मचाऱ्यावर सुरू आहे. त्यामुळे डायट सद्या ऑक्सिजनवर आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिक्षण विभागाचे 'डायट' ऑक्सिजनवर; एकाच कर्मचाऱ्याकडे सात जणांचा पदभार - Jalana education news
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी संस्थेतील काही अधिकारी तहसीलकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून या संस्थेचा कारभार केवळ एक कर्मचाऱ्यावर सुरू आहे. त्यामुळे डायट सद्या ऑक्सिजनवर आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने पहिली ते बारावीपर्यंत अभ्यासक्रम बदलल्यानंतर या बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी ही डायट( जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) कार्यरत आहे. जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी संस्थांमधील सुमारे पन्नास हजार शिक्षकांना या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी या संस्थेमध्ये एक प्राचार्य, तीन ज्येष्ठ अधिव्याख्याता, सहा अधिव्याख्याता, एक कारकून, एक लेखापाल, एक अधीक्षक, एक ग्रंथपाल , एक तंत्रज्ञ, एक सांख्यिकी सहाय्यक अशी पदे आहेत. यापैकी तीनही ज्येष्ठ अधिव्याख्याता तहसीलकडे वर्ग करण्यात आले आहेत. सहा अधिव्याख्याता पैकी तीन अधिव्याख्याता यांची बदली झाली आहे. आहे तर उर्वरित सर्व पदांचा कार्यभार सध्या या कार्यालयातील कारकून आत्माराम डवणे यांच्याकडे आहे. त्यामध्ये हे चार पद हे कारकुनाचे, एक लेखापाल, 1 अधीक्षक आणि एक ग्रंथपाल अशा एकूण सात पदांचा पदभार या कर्मचाऱ्याकडे आहे. त्यामुळे हे कार्यालय सध्या ऑक्सिजनवर आहे.
दरम्यान विषय सहाय्यक म्हणून जिल्हा परिषदेच्या दहा शिक्षकांना इथे हे शिक्षण आयुक्तांनी नियुक्त्या दिल्या आहेत. मात्र हे शिक्षक देखील दिवसभर कार्यालयात बसून काय करणार? म्हणून तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे हा सर्व कारभार येथील शिपाई पाहतात. येणाऱ्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल सोयीस्कर उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. एकंदरीत शिक्षकांना प्रशिक्षण देणारी ही संस्थाच सध्या ऑक्सिजनवर आहे.