महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - चर्मकार समाजाच्या वतीने मोर्चा

दिल्लीतील गुरु रविदास यांचे मंदिर पाडल्याचा निषेध म्हणून जालन्यात बुधवारी चर्मकार समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

जालन्यात चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By

Published : Aug 21, 2019, 3:12 PM IST

जालना -दिल्ली येथील तुघलकाबाद येथे असणारे सहाशे वर्षांपूर्वीचे गुरु रविदास यांचे मंदिर दिल्ली सरकारने तोडले. हे मंदिर पुन्हा बांधण्यात यावे, या मागणीसाठी जालन्यातील चर्मकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रास्तारोको करण्यात आला.

जालन्यात चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

या वेळी मोर्चेकरांकडून, मंदिर पाडणे हा चर्मकार समाजाचा अपमान आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. तसेच मंदिर तोडणारे दिल्लीचे सरकार हे चर्मकार समाजावर अन्याय करत आहे. त्यांनी चर्मकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या गुरु रविदास यांचे मंदिर पुन्हा बांधावे, अशी मागणी यावेळी चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आली. या मोर्चामध्ये जालना चर्मकार समाजाचे ईश्वर बिल्होरे, गणेश चांदोडे, राम जोहरे, धनराज डोंगरे व इतर समाजातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details