महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात प्रचार संपला तरीही प्रशासकीय तयारी अजूनही अपूर्णच.. - administration

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक चैतन्य एस आणि उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी आज (२१ एप्रिल) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची पूर्ण माहिती दिली.

जालन्यात प्रचार संपला तरीही प्रशासकीय तयारी अजूनही अपूर्णच..

By

Published : Apr 22, 2019, 8:00 AM IST

जालना -मंगळवारी (२३ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून मतदानासाठी सुरु असलेल्या प्रचार तोफा रविवारी (२१ एप्रिल) थंडावल्या. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेची माहिती देण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, प्रशासकीय तयारी अजूनही अपूर्ण असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक चैतन्य एस आणि उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी आज (२१ एप्रिल) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची पूर्ण माहिती दिली. मात्र, त्यांनी दिलेली माहिती ही पूर्णतः खोटी असून मतदारांपर्यंत कोणतीच प्रशासकीय यंत्रणा तसेच पोस्टल मत पत्रिका मतदारापर्यंत पोहोचलेली नसल्याच्या मुद्दा पत्रकारांनी उचलून धरला. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यानंतर या मुद्यावर दुजोरा दिला. मात्र, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करुन घेऊ, असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.

प्रशासकीय यंत्रणेची माहिती देण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

अशी आहे जालना प्रशासकीय यंत्रणा-
जालना लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. १५७८ ग्रामीण ४८० शहरी, अशा एकूण २०५८ मतदान केंद्रातून १८ लाख ६५ हजार ४६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक कामासाठी २२५ एसटी बसेस, ६७४ जीप, ३ टेम्पो ट्रॅव्हलर, १२ ट्रक, अशी एकूण ९१४ वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.

जालना मतदारसंघातून २० उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विलास अवताडे, भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे, यांच्यासह बहुजन समाज पक्ष, आसरा लोकमंच पक्ष, अखिल भारतीय सेना, बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष, बहुजन मुक्ती पक्ष, वंचित बहुजन आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष, यांच्या प्रत्येकी एक उमेदवारासह ११ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघांमध्ये ३९ मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ईव्हीएम मशीन खराब झाली, तर २० मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या संबंधित मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांवर जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. जेणेकरून या वाहनाची हालचाल लक्षात येईल. पोलीस अधीक्षक चैतन्य यांनीदेखील पोलिस प्रशासनाच्या वतीने केलेल्या तयारीची माहिती दिली.

यावेळी मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी 'वोटर्स सेल्फी पॉईंट'ही करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केल्यानंतर मतदार आपला फोटो या 'वोटर्स सेल्फी पॉईंट' मध्ये काढून इतरांनाही प्रोत्साहित करू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details