महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक योग दिन : शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन म्हणजे योगासने - international yoga day

27 सप्टेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केले आणि या भाषणादरम्यान वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेला 21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा करावा असे आवाहन केले होते. त्यांच्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या महासभेने सकारात्मक प्रतिसाद देऊन 2015 पासून 21 जून हा योगा दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिलीआहे.

जागतिक योग दिन
जागतिक योग दिन

By

Published : Jun 20, 2021, 12:04 PM IST

Updated : Jun 20, 2021, 1:18 PM IST

जालना- 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी केलेल्या आवाहनानुसार 2015 या वर्षापासून जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. जालना शहरात यंदाच्या योगा दिनाची पूर्वतयारी गेल्या पाच दिवसांपासून ज्वाला लॉन्स येथे सुरू आहे. सोमवारी 21 जूनला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा योग दिवस उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. त्याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा

जागतिक योग दिन
जगाने दिली मान्यता-27 सप्टेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केले आणि या भाषणादरम्यान वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेला 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या महासभेने सकारात्मक प्रतिसाद देऊन 2015 पासून 21 जून हा योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिलीआहे.
जागतिक योग दिन
मन आणि शरीर तंदुरुस्तीसाठी योगा -पहाटेच्या शांत वेळी प्राणायाम आणि योगासने केल्यामुळे मन शांत राहून शरीरही तंदुरुस्त राहते, त्यामुळे योगासने हे एक शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे वर्षभर विविध ठिकाणी प्राणायाम आणि योगाचे वर्ग घेतले जातात मात्र उद्या जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून नागरिकांना योगाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी जालना शहरातील ज्वाला लॉन्स येथे पूर्व तयारीवर्ग सुरू आहे .सकाळी सहा ते साडेसात वाजे दरम्यान इथे निशुल्क प्राणायाम आणि योगाचे वर्ग घेतल्या गेले.
जागतिक योग दिन
उद्या विविध कार्यक्रम-योग्य भूमी परिवाराच्या वतीने उद्या आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. त्यासाठी सकाळी सहा ते आठ वाजे दरम्यान ज्वाला लॉन्स येथे सूक्ष्म व्यायाम प्राणायाम योगासन आणि सूर्यनमस्कार त्यासोबत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्वांसाठी विनामूल्य असलेल्या या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवारी होणारे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीकिशन डागा, सुरेशसिंग तवर, दिनेश लोहिया, गणेश आंबट, डॉक्टर गणेश दराडे, मंजिरी फटाले, उषा तवर, अश्विनी अंभोरे, वैशाली लोहिया, आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
Last Updated : Jun 20, 2021, 1:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details