महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट लग्न लावून लुटणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

लग्न लावून लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल व पोलीस पथक
जप्त मुद्देमाल व पोलीस पथक

By

Published : Jan 19, 2021, 3:48 PM IST

जालना -लग्न लावून फरार झालेल्या 4 महिला व एका पुरुषाला, चंदणझिरा पोलिसांनी तीन जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुजरातच्या व्यक्तीची तक्रार

गुजरात येथील पियुष वसंत यांनी चंदणझिरा पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की, त्यांचे तीन नातलग महाराष्ट्रमध्ये बुलढाणा येथे लग्न लावण्यासाठी आले होते. त्यांना येथील काही लोकांनी मुली दाखवल्या व गुजरातकडे जात असताना नागेवाडी येथे आल्यातनंतर लघु शंकेचा बहाण्याने वाहनातून खाली उतरुन नवरदेवाचे मोबाईल व रोख रक्कम घेऊन पसार झाले.

बनावट लग्न लावून देणाऱ्यांचा शोध

गुन्ह्याची माहिती काढत असताना जालना जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीही बनावट लग्न करणाऱ्या महिलांचा शोध घेत असताना बनावट नवरी बनलेल्या एका तरुणीस शनी मंदिर जालना येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने इतर महिलांचे नावे, त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि अन्य माहिती सांगितली. त्या माहितीच्या आधारे पोलीसांनी औरंगाबाद, बुलढाणा, जालना जिल्ह्यातून महिलांना ताब्यात घेण्यात आले. नवरीचा भाऊ बनून त्यांच्यासोबत असणारा राहुल मस्के (रा. नागेवाडी) याला नागेवाडी टोलनाका येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या ताब्यातून तक्रारदारचे 3 व गुन्ह्यात वापरलेले 2, असे एकूण 5 मोबाईल, बॅग, रोख रक्कम व वापरलेली मोटार(क्र. एम एच 13 बीएन 2426), असा एकूण 4 लाख 60 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांनादोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -मानदेऊळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मामा भाचाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ

ABOUT THE AUTHOR

...view details