जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग राखत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव तालुकाभर साधेपणाने साजरा करण्यात आला. यानिमित्त तहसील कार्यालयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार महसूल प्रशासनातर्फे करण्यात आला. तसेच शहीद सैनिकांच्या मात्या-पित्यांचा सन्मान त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला, तर तालुक्यातील अंबडगाव येथे अँटिजन चाचणी शिबीर घेण्यात आले. येथील एका शाळेने ऑनलाइन देशभक्तीपर स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी भरगच्च कार्यक्रम, शाळांचा प्रभातफेऱ्या असतात. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साधेपणाने मात्र मोठया उत्साहात व नवनवीन संकल्पना राबवत पार पडला. बदनापूर तहसील कार्यालयात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसीलदार छाया पवार, पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, गटविकास अधिकारी विठठल हरकळ, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के आदींच्या प्रमुख उपस्थित सोशल डिस्टन्सींग ठेऊन पार पडला. त्यानंतर तालुक्यात कोरोना विषाणूचा मुकाबला करणाऱ्या विविध कोरोना योध्दांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उल्लेखनिय कार्य करणाऱे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुंभार, डॉ. कृष्णा सरोदे, डॉ. दीपक मलेचा, डॉ.उज्ज्वला चव्हाण, डॉ. सुरेखा सर्जे, रवी बोंद्रे, मनिषा मिसाळ, सलीम शेख, कोकीळा मदन, नगर पंचायतचे रशीद पठाण, मिलींद दाभाडे, विजय पाखरे, दस्तगीर सय्यद, लक्ष्मण पवार स्वच्छता कर्मचारी भगवान शेळके, मुनीर शहा, गौरव देशमुख, विकास होर्शिळ, फकिरचंद मगरे पोलिस प्रशासनाचे पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील, ढिल्पे, सुपेकर, जाधव, अनिल चव्हाण, शिवाजी भगत, मनोज निकम, काळुसे यांचा महसूल प्रशासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.